PFI च्या फुलवारी शरीफ प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभर छापे
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या फुलवारी शरीफ प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कर्नाटक, केरळ आणि बिहारमधील 25 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहे. एनआयएच्या पथकाने कटिहारच्या हसनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मुझफ्फर टोला येथे सुमारे ३ तास कारवाई केली. यावेळी एनआयएच्या पथकाने नासिर हुसैन यांच्या घरातील अनेक कागदपत्रांची झडती घेतली. ही केस सुरुवातीला 12 जुलै 2022 रोजी पोलिस स्टेशन फुलवारी शरीफ, जिल्हा पाटणा, बिहार येथे नोंदवण्यात आली होती आणि NIA द्वारे 22 जुलै 2022 रोजी पुन्हा नोंदणी करण्यात आली. पीएफआयशी संबंधित काही लोक फुलवारीशरीफ, पाटणा येथे पोलिसांनी छाप्यात पकडले होते. NIA ने 7 जानेवारी 2023 रोजी चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
आजच्या छाप्या दरम्यान स्थानिक लोकांच्या मते, एनआयएने मेहबूब आलम नदवीचा भाऊ मोहम्मद जावेद याला चौकशीसाठी सोबत घेतले आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आरोपींपैकी एक असलेल्या अन्वर बाबत तपास यंत्रणेने महत्वाचा खुलासा केला आहे. “अन्वर हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना सिमीचा माजी सदस्य असल्याचे आणि सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक पीएफआय सदस्यांशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे, ज्यामध्ये एफआयआरमध्ये नाव असून गेल्या वर्षी 12 जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या अतहर परवेझचा समावेश आहे,” असे NIA म्हटले आहे.एनआयएच्या तपासानुसार, पीएफआयसाठी काम करण्यासाठी सिमीच्या माजी सदस्यांच्या गुप्त गटाला तयार करण्यात अन्वरचा हात होता, असे एनआयएने म्हटले होते. PFI च्या बॅनरखाली मुख्य अजेंडा, संघटनेच्या ‘इंडिया 2047 डॉक्युमेंट’ मध्ये कल्पना केल्याप्रमाणे भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे हा होता.
आजच्या छाप्यात इंडिया २०४७ नावाचा ७ पानी दस्तावेजही सापडला आहे. यामध्ये येत्या २५ वर्षात भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना आखण्यात आली होती. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मुस्लिम तरुणांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी ६ जणांना अटक करण्यात आली होती.
SL/KA/SL
31 May 2023