राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून आघाडीच्या बँकेला २५ लाखांचा दंड

 राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून आघाडीच्या बँकेला २५ लाखांचा दंड

बंगळुरु, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

ग्राहकाच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवल्याबद्दल राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने NCDRC देशातील आघाडीच्या बँकेला २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. NCDRC अध्यक्ष सदस्य सुभाष चंद्रा या खटल्याची सुनावणी करत आहेत, त्यांनी बँकेला सर्व कागदपत्रे नव्याने तयार करण्यास सांगितले आहे. या खटल्याच्या सुनावणीत झालेल्या खर्चापोटी तक्रारदाराला अतिरिक्त 50 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.बंगळुरु येथील ICICI बँकेच्या एका शाखेत एका ग्राहकाने 1.86 कोटी रुपयांचे गृहकर्ज घेण्यासाठी बँकेला तारण म्हणून त्याच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे दिली होती. ही कागदत्रे हरवल्याबद्दल आयोगाचे बँकेवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.

एप्रिल 2016 मध्ये बंगळुरू येथील मनोज मधुसुधनन नावाच्या व्यक्तीने ICICI बँकेकडून 1.86 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, जे 1.72 लाख रुपयांच्या EMI वर 20 वर्षात फेडायचे होते. या गृहकर्जासाठी त्यांनी मालमत्तेचे नोंदणीकृत विक्रीपत्र, ताबा प्रमाणपत्र, खाते प्रमाणपत्र, कर पावतीसह अनेक मूळ कागदपत्रे सादर केली होती. परंतु बँकेने या कागदपत्रांची कोणतीही स्कॅन कॉपी मधुसूदन यांना दिली नाही. तब्बल 3 महिन्यांनंतर हैदराबादमधील कुरिअर सेवेच्या निष्काळजीपणामुळे कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती बँकेने दिली.

त्यानंतर त्यांनी बँकिंग लोकपालाकडे याबाबत तक्रार केली. सप्टेंबर 2016 मध्ये लोकपालने बँकेला ग्राहकाच्या हरवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची एक प्रत बनविण्याचे, या संदर्भात सार्वजनिक नोटीस जारी करण्याचे आणि तक्रारदाराला 25,000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.परंतु मधुसुधनन यांनी या प्रकरणाची तक्रार एनसीडीआरसीकडे केली आणि बँकेच्या निष्काळजीपणाबद्दल 5 कोटी रुपयांची भरपाई दावा केला आणि म्हटले की, मूळ कागदपत्राची कोणतीही स्कॅन कॉपी घेऊ शकत नाही.

बँकिंग लोकपालच्या आदेशाच्या आधारे, आयोगाने या प्रकरणासाठी बँकेला जबाबदार धरले आणि बँकेच्या खर्चाने सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तयार करून ग्राहकांना देण्यास सांगितले. 25 लाखांच्या नुकसान भरपाईशिवाय 50 हजार रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे.

SL/KA/SL

6 Sept 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *