महानगरपालिकेच्या दोन आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय प्रमाणीकरण
नागपूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महानगर पालिकेच्या इंदोरा आणि शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (यूपीएचसी) सर्वाधित गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणिकरण (NQAS) प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मनपाची ही दोन्ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र NQAS प्रमाणिकरण प्राप्त केलेले महाराष्ट्रातील पहिले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ठरली आहेत.National Accreditation of Two Municipal Health Centers
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत प्रमाणित झालेल्या आरोग्य संस्थांचे निकाल आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांचे द्वारे जाहीर करण्यात आले. यामध्ये नागपूर मनपाच्या इंदोरा नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राने ८५.२ टक्के तर शांतीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने 83 टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील (NQAS) प्रमाणीकरण मिळविले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभागाने यश प्राप्त केले आहे.
ML/KA/PGB
24 May 2023