नाथषष्ठी यात्रा सुरू

 नाथषष्ठी यात्रा सुरू

छ संभाजीनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पैठण येथील संत एकनाथ महाराज नाथषष्ठीनिमित्त आज पासून यात्रा भरली असून भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले आहे.यात ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे .

भानुदास, एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमली असून ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.पैठण येथिल नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठणनगरीत दाखल झाल्या आहेत.Nath Shashti Yatra begins

दिंड्यांचे आगमन होताच प्रत्येक दिंडीचे उत्साह पूर्व स्वागत करण्यात आले. शहरातील सर्व रस्ते फुलून गेले.टाळ, मृदंगाचा निनाद व मुखी एकनाथ भानुदास, ज्ञानोबा, तुकोबाच्या जयघोषाने भाविकांनी पैठण शहर दणाणून गेले.
पैठण येथिल नाथषष्ठी यात्रा मोठ्या उत्सहात साजरी होत आहे. पैठण येथे दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी होत असते.

अशी भरते यात्रा

यात्रा परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्रेते, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत.भाविकांच्या गर्दीमुळे या व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळेल व मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यवसायिक करीत आहे.

ML/KA/PGB
13 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *