नाशिकमध्ये जोरदार पाऊस,रामकुंड परिसर पाण्याखाली…

नाशिक दि २८ : जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर यांसारख्या अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना संभाव्य पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या विसर्गामुळे गोदावरी आणि दारणा नद्यांना पूर आला असून, रामकुंड परिसर आणि नदीकाठची अनेक मंदिरे, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या चांदोरी, सायखेडा, कोठुरे, करंजगाव आदी सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येवला, मनमाड, निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्रंबकेश्वर, दिंडोरी आधी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.ML/ML/MS