तपोवनातील १८०० वृक्षांच्या कत्तली विरोधात एकवटले नाशिककर
नाशिक, दि. २१ : पुढील वर्षी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केली आहे. दिडवर्षांहून अधिक काळ सुरु राहणाऱ्या या कुंभकाळात देशविदेशातीतून ६ कोटी लोक नाशिक-त्र्यंबकला भेट देतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. १२ वर्षांनी होऊ घातलेल्या या कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिककरही उत्सुक असले तरीही यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या १८शे वृक्षांच्या तोडीबाबत नाशिककरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. येथील तपोवन भागातील १८ शे मोठे वृक्ष तोडून तिथे साधू ग्राम उभारण्याचा घाट शासनाने घातला आहे. शहराच्या निसर्गाची प्रचंड हानी करणाऱ्या निर्णयाविरोधात आता नाशिककरांनी मोठे आंदोलन उभारले आहे. तपाेवनात साधूग्राम उभारण्यासाठी ५४ एकरावरील वृक्षांचे सर्वेक्षण करत १८०० हून अधिक झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे ताेडण्यात येणार असल्याच्या संतापातून पर्यावरणप्रेमींनी वृक्ष आलिंगन आंदाेलन करत ‘हे रामा, ही १८०० झाडे तूच वाचव, प्रशासनाला सुबुद्धी दे’ असा संताप व्यक्त केला. या वृक्षताेडीविराेधात आतापर्यंत ४५० हरकती दाखल आहेत. त्यावर साेमवारी (दि. २४) सुनावणी हाेणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या या पर्यावरण विरोधी निर्णयाबाबत राज्यभरातील वृक्षप्रेमी संघटनांकडून टीका होताना दिसत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या भयंकर निर्णयाबाबत संताप व्यक्त केला आहे..सयाजी शिंदे हे वृक्षसंवर्धक आणि पर्यावरणप्रेमी आहेत. नाशकातील तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. कुंभमेळ्यााठी वृक्षतोड होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत थेट इशाराही दिला आहे. सयाजी शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
तपोवनमधली झाडं तोडणं हा अत्यंत दुर्वेवी असा निर्णय आहे. कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यासाठी इतक्या झालांची कत्तल करणं हे अजिबातच योग्य नाहीये. एक झाड तोडून दहा झाडे लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी आम्ही १०० माणसं उभी करू, १०० जणांचं बलिदान देऊ…पण ते झाड तोडू देणार नाही….असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.
SL/ML/SL