नाशिक कुंभमेळ्याचे वेळापत्रक जाहीर

नाशिक, १ : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आणि प्रमुख धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली.
३१ ऑक्टोबर २०२६ पासून शुभारंभ
कुंभमेळ्याचा शुभारंभ आणि प्रमुख कार्यक्रम
३१ ऑक्टोबर २०२६ – ध्वजारोहण सोहळा रामकुंड येथे पार पडेल.
२४ जुलै २०२७ – साधुग्राममध्ये आखाडा ध्वजारोहण.
२९ जुलै २०२७ – नगर प्रदक्षिणा.
२४ जुलै २०२८ – ध्वज उतरवण्याचा समारोप सोहळा.
शाही स्नान (अमृत स्नान) तारखा
२ ऑगस्ट २०२७ – पहिले अमृत स्नान.
३१ ऑगस्ट २०२७ – दुसरे अमृत स्नान.
११ सप्टेंबर २०२७ – तिसरे आणि अंतिम अमृत स्नान.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील स्नान
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वरीलच तारखांना स्नानांचे आयोजन होणार आहे, आणि लाखो भाविक या पवित्र स्नानांसाठी उपस्थित राहतील.
सरकारी तयारी आणि सुविधा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात पार पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे