सिंधुदुर्गात दिवाळीच्या मध्यरात्री रंगतात नरकासुराच्या स्पर्धा
सिंधुदुर्ग दि २० – दिवाळी आली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाल गोपाळ आणि मित्र मंडळ यांना नरकासुर बनवण्याचे वेध लागतात. उंच उंच नरकासुर , हालते बोलते नरकासुर बनवण्याची स्पर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी भरवल्या जातात. दिवाळीच्या मध्यरात्री हे सर्व नरकासुर एकत्रित मांडण्यात येतात. या ठिकाणी स्पर्धेचे परीक्षण होते .बक्षीस समारंभ होतो आणि त्यानंतर नरकासुराचे दहन आपापल्या वाड्या वस्त्यांमध्ये वाजत गाजत जाऊन करतात.
नरकासुर स्पर्धा आणि दहन करण्याची प्रथा विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यामध्ये पाहायला मिळते. मध्यरात्री रंगणाऱ्या या नरकासुराच्या स्पर्धेला मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात.ही स्पर्धा फक्त मजेसाठी नाही, तर कल्पकतेचं आणि एकतेचं उदाहरण असते.अशी परंपरा कोकणाची ओळख बनली आहे. कणकवली ,कुडाळ ,
सावंतवाडी, बांदा यासह अनेक ठिकाणी नरकासुराच्या स्पर्धा पहाटेपर्यंत रंगल्या होत्या.ML/ML/MS