नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्क पोलिसांनी केली अटक, दोन व्यक्तींनी जिवंत जाळल्याचा आरोप

लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या तिच्या बहिणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिची बहीण आलिया फाखरीने केलेल्या हत्येमुळे ही चर्चा सुरू आहे. नर्गिसची बहीण आलियावर दोन व्यक्तींच्या हत्येचा आरोप आहे. आलियाने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड यांची जिवंत जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. तिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. 43 वर्षीय आलियाने आग लावली त्यात त्यांचा जळून मृत्यू झाला आहे. दरम्यान आलियाच्या आईने आपली मुलगी असं काही करू शकत नाही असं म्हणत मुलीवरचे आरोप फेटाळले आहेत. याबाबत अद्याप नर्गिसने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.