प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाशिक येथे आगमन

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाशिक येथे आगमन

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग, नाशिक येथील हेलिपॅड वर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो मध्ये भाग घेत गोदावरी नदी तीरावरील रामकुंड इथे त्यांनी जलपूजन केले यानंतर ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले.

ML/KA/PGB 12 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *