नारायण मूर्ती – सुधा मूर्ती यांच्यावर ३ भाषांमध्ये येणार बायोपिक

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यावर आता चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शक-निर्माता ही तिहेरी जबाबदारी अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी सांभाळणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि नारायण मूर्ती यांच्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडमध्ये तयार होणार आहे. चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यात आहे. याविषयी लवकरच घोषणा केली जाणार आहे.
ML/ML/PGB 11 mar 2025