नांदेडचा विष्णूपरी प्रकल्प 100 टक्के भरला…

 नांदेडचा विष्णूपरी प्रकल्प 100 टक्के भरला…

नांदेड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज 100% क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडण्यात असून त्यातून 471 cumec (16632.00 cusec) पाण्याचा विसर्ग होत आहे. Nanded’s Vishnupari project is 100 percent full…

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे.

ML/KA/PGB
28 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *