कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कॉंग्रेस भवनाचे उद्घाटन

 कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कॉंग्रेस भवनाचे  उद्घाटन

उल्हासनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर मध्ये कॉंग्रेसच्या कार्यालयाचे नुतनीकरन झाले असुन त्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी त्यांनी उल्हासनगर शहरातील विविध गंभीर समस्यावर चर्चा केली . उल्हासनगर शहरात कॅंप २ येथिल नेहरु चौकात कॉंग्रेस चे कार्यालय असुन या कार्यालयाचे नुतनीकरन करण्यात आले आहे . तेव्हा या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी त्यांनी शहरातील अनेक समस्या जाणुन घेतल्या . त्या मध्ये मुस्लिम कब्रस्थान , धोकादायक इमारती , शहरातील बिगड़लेली कायदा व सुव्यवस्था , पर्यावरण या विषयावर शहरातील सामाजिक संस्था यांच्या सोबत चर्चा केली. दरम्यान नाना पटोले यांचे उल्हासनगरात आगमन होताच शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रोहित साळवे , माजी उपमहापौर श्रीमती जया साधवानी यांनी त्यांचे ज़ोरदार स्वागत स्वागत केले . दरम्यान यावेळी सिंधी समाजातील महानुभाव व कला क्षेत्रातील लोकांना सन्मानित करण्यात आले . उल्हासनगर शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावर पटोले यांनी उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त डॉ . सुधाकर पठारे यांच्या सोबत चर्चा केली. दरम्यान त्यांनी उल्हासनगर ५ येथिल वसनशा दरबारला भेट दिली असुन त्या दरबार चे काली सांई यांच्या सोबत विस्तृत चर्चा केली . या एक दिवसीय संपर्क दौऱ्यात त्यांच्या सोबत माजी मंत्री नसीम खान, मनोज शिंदे, हे उपस्थित होते . तर या कार्यक्रमाला माजी महापौर हरदास माखीजा, माजी उपमहापौर जया साधवानी, मोहन साधवानी, डॉ. जयराम लुल्ला, किशोर धडके, कॉंग्रेस सेवादलचे अध्यक्ष शंकर आहुजा, प्रदेश सदस्य वजिवुद्दीन खान , कॉंग्रेस उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अनिल सिन्हा तसेच या संपर्क दौऱ्याचे आयोजक आणि उल्हासनगर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे हे उपस्थित होते .

ML/KA/PGB 11 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *