चिंचवडसाठी राष्ट्रवादीचे नाना काटे
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांनी आपला उमेदवारी दाखल केली. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीमध्ये विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सहभागी झाले. यावेळी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आज काटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होती.
कलाटे काय करणार
शिवसेना ठाकरे गटाच्या राहूल कलाटे यांनी अपक्ष म्हणून गेल्या वेळीही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती, यावेळी त्याच आधारे पुन्हा पक्षाची उमेदवारी मागितली होती, मात्र ही जागा राष्ट्रवादी कडे गेल्याने कलाटे काय करतात ते पाहावे लागेल.
ML/KA/SL
7 Feb. 2023