नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय मित्रपक्ष महायुतीच्या प्रभाग क्रमांक 206 उमेदवार नाना आंबोले यांच्या प्रचाराला शिवडीकरांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दाखवला. आंबोले यांच्या प्रचारायला ठीक ठिकाणी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. आंबोले यांच्या प्रचारामध्ये वयोवृद्ध महिलांनी घराघरात त्यांची आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभाशीर्वाद दिले.
आम्ही प्रभागात नेहमीच काम करत असतो. याआधी आम्ही 24 तास नागरिकांसाठी उपलब्ध होतो. माझ्या प्रभागांमध्ये अनेक शासकीय रुग्णालय असल्याने अनेक नागरिक मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी तसेच त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी फोन करत असतात. तर मी रात्री 11 रात्री दोन दोन तीन वाजता देखील त्यांचे फोन उचलून त्यांना रुग्णालयाचे कामासाठी सहकार्य करतो. तसेच प्रभागांमध्ये माझा जनसंपर्क हा थेट सामान्य नागरिकांशी जोडल्या असल्याने मला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत. यास नागरिकांच्या शुभाशीर्वादाने मी नक्कीच प्रभाग क्रमांक 206 शिवडी येथून विजयी होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले यांनी दिली.