नमो उद्यान ठरणार येवल्याचे आकर्षण

 नमो उद्यान ठरणार येवल्याचे आकर्षण

येवला, दि २७:- पैठणी, शिवसृष्टी, मुक्तीभूमीनंतर आता नमो उद्यान येवल्याचे आकर्षण ठरणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पना आणि नेतृत्वात हे उद्यान विकसीत केले जाणार आहे. या उद्यानासाठी राज्य सरकारने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.

येवला शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचे मनोरंजन केंद्र निर्माण व्हावे म्हणून नमो उद्यान साकारले जाईल, असे महायुतीच्या वचननाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. नमो उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, आकर्षक बागा व पाण्याचे फवारे बसविण्यात येणार आहेत.

दर्जेदार उद्यान, हरित परिसर, विश्रांती व फिरण्यासाठी सुविधा या उद्यानात उपलब्ध होईल. हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने येवला शहरवासियांना मोठा फायदा होईल. निसर्ग, संस्कृती, आरोग्य आणि आधुनिक सुविधा यांचा सुंदर समन्वय असलेले नमो उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

नमो उद्यानासाठी सध्या जागेची निश्चिती केली जात आहे. किमान ५ एकर परिसरावर हे उद्यान साकारण्याचे नियोजन केले जात आहे. नामांकीत वास्तुविशारदाकडून या उद्यानाचे प्रतिरूप तयार केले जाईल. या उद्यानासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचेही नियोजन सुरु आहे. त्यामुळे नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हे उद्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असा प्रयत्न असल्याचे पंकज भुजबळ यांनी सांगितले आहे.

येवला शहरात नमो उद्यान साकारण्याचे आम्ही निश्चित केले आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येवला शहर परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण ते असेल. हे उद्यान येवल्याची ओळख व्हावी असा आमचा प्रयत्न आहे.

  • पंकज भुजबळ, आमदार

नमो उद्यानाची वैशिष्ट्ये…
अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक – आकर्षक ग्रेनाइट, कॉबेल स्टोन, नैसर्गिक रेड क्ले ब्रिक्स, डेकोरेटिव स्ट्रीट लाइट्स व स्पीकर प्रणाली
ग्रीन जिम – खुल्या हवेत व्यायाम करण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र जिम.
लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया
बालकांच्या सुरक्षिततेसाठी ईपीडीएम फ्लोअरिंग
अम्फीथिएटर
शिल्पकलेचे विविध नमुने
ओपन ऑडिटोरियम
सुरक्षित आणि आधुनिक व्यवस्था
रोलर हॉकी ग्राऊंड
बास्केटबॉल आणि टेनिसकोर्ट्स
उच्च गुणवत्ता पॉलीयुरेथेन फ्लोरिंग
योग आणि ध्यानझोन – शांत व हिरवळीत विसाव्याची जागा
बांबूची पक्षी घरटी – चिमण्या व विविध पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवासस्थाने
रेनवॉटर हार्वेस्टिंग
सोलर लाइट्स
पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कंपोस्ट युनिट

KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *