विधिमंडळात अध्यक्ष आणि उपसभापतींमध्ये बेबनाव
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त असताना उपसभापतींना अधिकार असतात मात्र विधीमंडळासंदर्भातील कोणतेही निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांकडून उपसभापतींचं मत विचारात घेतलं जातं नाही अशी नाराजी उपसभापती नीलम गोर्हे यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केली.
यापूर्वी जे काही निर्णय घेतले ते उपसभापतींना कळवण्यात आले नाहीत असं सांगत मी केवळ सभागृहापुरती उपसभापती आहे का..?असा प्रश्न नीलम गोर्हे यांनी उपस्थित केला यामुळे विधिमंडळात दोन्ही पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद असून पूर्ण बेबनाव असल्याचं स्पष्ट झालं आहे.
पूर्वी कोणताही निर्णय घेताना अध्यक्ष आणि सभापतींच्या बैठका व्हायच्या त्या आता होत नाहीत ,असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.आज नियमित कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेतील सदस्यांना विधिमंडळाचे पास देण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.
सभापतींचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत अशी भूमिका शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं.Nameless among the Speaker and Deputy Speaker in the Legislature
यावर सरकारच्या वतीनें बोलताना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी , सभागृहात यासंदर्भात चर्चा करणं योग्य नाही असं सांगत यासंदर्भात अध्यक्षांशी बोलून गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल असं सांगितलं.
मागच्या काळात अध्यक्षांना विश्वासात न घेता सभापतींनी निर्णय घेतले याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
ML/KA/PGB
16 Mar. 2023