विधवा महिलांसाठी नाव बदलाचा निर्णयच नाही

 विधवा महिलांसाठी नाव बदलाचा निर्णयच नाही

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधवा महिलांसाठी त्यांचे संबोधन अन्य कोणत्याही प्रकारे करण्याचा कोणताही निर्णय सरकारने अजून घेतलाच नाही असा खुलासा महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.Name change is not a decision for widowed women

आपल्याकडे राज्य महिला आयोगाकडून विधवा महिलांच्या उल्लेखात विधवा हा शब्द काढून त्यांना समाजात सन्मान मिळण्यासाठी पूर्णांगी , सक्षमा आदी पर्यायी नावे देण्याचा प्रस्ताव आला होता, त्यावर तो प्रधान सचिवांकडे पाठवून प्रस्ताव सादर करण्यास आपण सांगितले, तसेच असे आणखी प्रस्ताव आले त्यात गंगा भागीरथी असेही नाव होते असे लोढा यावेळी म्हणाले.

मात्र गंगा भागीरथी हे नाव कोणी सुचविले होते , त्यावर सरकार पुढे काय निर्णय करणार आहे अशा प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांनी यावेळी दिली नाहीत . एकंदरीतच गंगा भागीरथी या विषयावर चहूबाजूने टीकेची झोड उठल्यावर लोढा यांनी सावध पवित्रा स्वीकारल्याचे दिसून आले.

ML/KA/PGB
13 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *