नमाज पठण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

 नमाज पठण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला

अहमदाबाद, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठात काल रात्री उशिरा अफगाणी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांवर जमावाने हल्ला केला. गमछा परिधान करून जय श्रीराम म्हणत जमावाने वसतिगृहात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. वसतिगृहात दगडफेक आणि तोडफोडही झाली. तर ५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

घटनेबाबत वसतिगृहात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही येथे शिकण्यासाठी येतो. हीच अट असेल तर सरकारने व्हिसा देऊ नये. वसतिगृहाच्या खोलीत घुसल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. लॅपटॉप, एसी, कपाट, टेबल, दरवाजे, म्युझिक सिस्टीमची मोडतोड झाली. इथल्या अनेक सणांमध्ये आम्ही सहभागी होतो, सगळे आमचे भाऊ आहेत, पण हे अपेक्षित नव्हते. अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, सीरिया आणि आफ्रिकन देशांतील विद्यार्थी गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहतात आणि शिक्षण घेतात.

मारहाणीची घटना 16 मार्चच्या रात्री विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या ए ब्लॉकमध्ये घडली. वसतिगृहात नमाज अदा करत असताना मारहाण झाल्याचा आरोप अफगाण विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, 200 हून अधिक लोकांचा जमाव जय श्रीरामचा नारा देत वसतिगृहात घुसला. जमावातील काही लोकांनी दगडफेक करत वसतिगृहाची तोडफोडही केली. वसतिगृहात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनांचीही जमावाने तोडफोड केली.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी पोलिस आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी त्यांनी डीजी आणि सीपी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरू केला आहे.

विद्यापीठाच्या घटनेवर, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना X वर टॅग केले आहे आणि विचारले आहे की मुस्लिम शांततेने नमाज देखील अदा करू शकत नाहीत का?

SL/ML/SL

17 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *