नालेसफाई वरून मुख्य अभियंत्याला दिली कारणे दाखवा नोटीस

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेचे पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता विभास आचरेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सांताक्रूझ येथील मिलन सबवे येथे नालेसफाईची पाहणी करताना नाला अस्वच्छ असल्याने तसेच त्याची स्वच्छता झालेली नसल्याने त्याना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे.अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. यावेळी त्यांनी गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेचा महाप्रबंधक यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ML/KA/PGB 19 May 2023