*नायगावच्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि १८: मुंबई महानगर पालिका निवडणुकींच्या गजबाजाजाटाने दुषित झालेलं वातावरण,नायगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज बाजूला सारुन महारक्तदान शिबीर आयोजित केले आणि इतिहास रचला आहे.
नायगावेश्वर महागणपती उत्सवाचे हे ९७ वे वर्ष असून,चार दिवसाने माघी गणेशजयंती साजरी होत आहे, हे औचित्यसाधून हे महारक्तदान आणि नेत्रचिकित्साशिबिराचे आयोजन करण्यात आले ,असे मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गोपाळे यांनी सांगितले.
शिबिराला विभागीय आमदार कालिदास कोळमकर यांनी प्रथम भेट देऊन सामान्य माणसाशी जोडून असलेली नाळ दाखवून दिली. विभागीय खासदार अनिल देसाई आणि याच मतदारसंघातून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या उर्मिला पांचाळ यांनी कार्यक्रमस्थळाला दिलेली भेट लक्षणीय ठरली आहे.
मुंबईमधील टाटा इस्पितळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला रक्तदात्यांनी मोठाच प्रतिसाद दिला. सार्वजनिक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही जिवापाड मेहनत केल्याने दोन्ही शिबिराचा लोकांना चांगलाच लाभ झाला. लोकमान्य टिळकांनी मुंबईत स्वातंत्र्यपूर्वकाळी १८९३ मध्ये गिरगावात केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे लोकसेवेची वहिवाट सर्वत्र सुरू झाली,ही परंपरा नायगावेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या उपक्रमांद्वारे जोपासली म्हणून विभागात सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.!KK/ML/MS