विसावा नागरी निवारा फेडरेशनची निवडणूक जल्लोषात

मुंबई : गोरेगावं पूर्व येथील नागरी निवारा फेडरेशन ची पंच वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. विसावा नागरी निवारा ज्येष्ठ नागरिक संघाचे, हिंदुराव वाडते ( अध्यक्ष ), मुकुंद सावंत, सुशील घाग, राजू पायरे, व संतोष कांबळे हे पाच सदस्य नागरी निवारा फेडरेशन, मुंबई वर अटीतटीच्या निवडणुकीत निवडून आल्याने त्यांचा, भव्य सत्कार नुकताच नागरी निवारा प्लॉट नंबर ६, संस्थेच्या कार्यालयात मोठया उत्साहातसंपन्न झाला.
नवनिर्वाचित सभासदांचा सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला तसेच माहे जुलै २५ मध्ये वाढदिवस असलेल्या सभासदांचेही सत्कार करण्यात आले.
सर्वश्री मुकुंद सावंत, संतोष कांबळे, हिंदुराव वाडते व बाळकृष्ण हळदणकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश फटनाईक यांनी फार सुंदर केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी रमेश शेलार, रोहिदास बुद्धिवंत सोनू वारंग, बबन बोले व शैलजा बोन्द्रे सह सर्व ज्येष्ठ नागरिक सोहळ्यास उपस्थित होते.KK/ML/MS