नागपुरात महिला अत्याचारांत वाढ; महिन्याला सरासरी २६ गुन्हे

 नागपुरात महिला अत्याचारांत वाढ; महिन्याला सरासरी २६ गुन्हे

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांसाठी सुरक्षित अशी प्रतिमा असलेल्या उपराजधानीत अल्पवयीन मुली व महिला सुरक्षित नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांतच महिला अत्याचार व विनयभंगांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. २०२३ मधील पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यंदा महिला अत्याचार २१.३७ टक्क्यांनी वाढले आहेत. जर आकडेवारीची सरासरी काढली तर यंदा महिन्याला सरासरी पाच अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. ही आकडेवारी महिला सुरक्षेचे दावे करणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारी आहे.

नागपुरात भर रस्त्यांवर होणाऱ्या विनयभंगाच्या घटना हादेखील मोठा चिंतेचा विषय आहे. मागील वर्षभरात विनयभंगाच्या ५०६ घटनांची नोंद झाली होती व जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत २५२ गुन्हे झाले होते. विधिमंडळात यावरून विरोधकांनी प्रश्नदेखील उपस्थित केले होते. यावर्षी हाच आकडा २४० इतका असून पोलिसांकडून विविध उपक्रम राबविल्यानंतरदेखील या घटनांमध्ये फारशी कमी झालेली नाही. यंदा दर महिन्याला विनयभंगाचे सरासरी ४० गुन्हे नोंदविले गेले.

PGB/ML/PGB
30 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *