श्रीरामनवमी निमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन..

 श्रीरामनवमी निमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन..

नागपूर दि २६ : श्रीरामनवमी निमित्त आज नागपुरात अतिशय पुरातन असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाची आरती करून हिंदू परंपरेनुसार पूजा अर्चना करण्यात आली. श्रीरामनवमी निमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. या शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी रथ ओढून रवाना केले.

ही शोभायात्रा नागपुर शहरातील विविध भागातून नेण्यात आली , या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. हिंदू धर्मातील देवी, देवांचे, ऐतिहासिक मंदिर, प्राचीन परंपरा, पुरातन संस्कृती, विविध संतांचे आकर्षक देखावे बघण्यासाठी नागपूरकरांनी रस्त्यांचा दोन्ही बाजूंना मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. याशिवाय नागपुर शहराचा विविध परिसरात भोजनदान, सरबत, फळांचे वितरण करण्यात आले. रामनवमी निमित्त नागपुरात उत्साहाचे वातावरण असून अनेक राम मंदिरात विविध धार्मिक कार्याचे आयोजन करण्यात आले होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *