नागपूर-शिर्डी थेट बस सेवेला सुरुवात
नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर काल सांयकाळला नागपूर – शिर्डी या एसटी विशेष बस सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागातर्फे हिंदू हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर एस टी महामंडळ ची विशेष बस सेवा नियमित धावणार आहे. विभागीय नियंत्रण श्रीकांत गभने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पहिल्या बसला रवाना करण्यात आले. बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते.
स्लीपर आणि सिटिंग दोन्ही पद्धतीची व्यवस्था या बस मध्ये असून पहिल्या दिवशी विशेष करून ज्येष्ठ नागरिकानी सर्वाधिक लाभ या सेवेचा घेतला. 65 वर्ष वयाच्या वरच्या नागरिकांना तिकीट मध्ये 50 टक्के सूट आहे तर 75 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना हा प्रवास मोफत असणार आहे. पहिल्या फेरीमध्ये तीस प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घेतला.
रात्री ९ वाजता गणेशपेठ मधील बस स्थानकातून ही बस रवाना झाली असून आज सकाळी ५ वाजता बस शिर्डी ला पोहोचणार आहे. समृध्दी महामार्ग वरून प्रवास करून साई बाबांचे दर्शन होणार असल्याने प्रवाशांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळाला.
ML/KA/SL
16 Dec. 22022