नागपूरात थंडी वाढली, पारा 11.2 डिग्रीवर …

 नागपूरात थंडी वाढली, पारा 11.2 डिग्रीवर …

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या तीन दिवसांपासून नागपूरात पारा घसरत असून थंडी चा जोर चांगलाच वाढला आहे . त्यामुळे सर्वत्र हुडहुडी जाणवू लागली आहे .

काल नागपूरात किमान तापमान 11.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने As the minimum temperature was recorded in Nagpur yesterday at 11.4 degrees Celsius यंदाचा मोसमातील सर्वात थंड दिवस नागपूरकरांना हुडहुडीचा ठरला. थंडी पासून बचावासाठी नागरिक रात्री आणि सकाळ ला शेकोट्याचा आधार घेत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे .

नागरिक घोळक्याने लाकूड तसेच काडी कचरा पेटवून स्वतःला ऊब देण्याचा प्रयत्न करीत आहेत . रात्री आणि सकाळी थंड वारे वाहत असल्याने नागरिक स्वेटर, मफलर, शॉल, कानाला टोपरे घालूनच घराबाहेर निघत आहेत. सध्या जाणवू लागणाऱ्या थंडीचा अनुभव घेता डिसेंबर व जानेवारी महिना चांगलेच गारठणार असल्याचे दिसत आहे.

ML/KA/PGB
28 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *