नागपूर एम्सच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. अनंत पंढरे यांच्या हाती

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संभाजीनगर येथील डॉ. हेगडेवार रुग्णालयाचे विश्वस्त डॉ अनंत पंढरे यांची नागपूर मधील नामांकित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या (एम्स) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संसदेच्या कायद्याव्दारे सार्वजनिक उच्च शिक्षण संस्थेला दिला जाणारा विशेष दर्जा ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून एम्सला प्राप्त झाला आहे. मिहान नागपूरला १५० एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या एम्स येथे ९६० खाटांचे अत्यंत भव्य असे रुग्णालय आहे. येथे जवळपास दररोज १५० रुग्ण भरती होतात तर साडेचार हजार रुग्ण दररोज उपचार घेतात.
या रुग्णांच्या सेवेसाठी चांगल्या डॉक्टरांची अशी फौज तैनात असते आणि त्यांच्या मार्गदर्शाखाली सुमारे ६०० विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेत आहेत. डॉ. अंनंत पंढरे रेड क्रॉस संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून गेल्या ३५ वर्षांपासून डॉ. हेगडेवार रुग्णालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीगनर येथे ३५ एकर जमिनीवर उभारलेल्या श्री रामचंद्र वैद्यकिय महाविद्यालयाच्या संचालक पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहेत.
हेगडेवार रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. डॉ. अनंत यांची (एम्स) अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
SL/ML/SL
20 Feb. 2025