नागपुरातही रिमझिम पाऊस सुरू, बोचरी थंडी पडली
नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडत असल्याचा फटका नागपूर जिल्हयातील शेतकऱ्यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील धान कापून शेतात ठेवला आहे.. या पावसामुळे धान ओला झाला असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे..
याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीही फटका बसणार असून बोंडावर आलेला कापूस भिजणार आहे… तसेच गहू आणि चण्याची रोपण केलेली पिके पावसाच्या पाण्यात नाहीसे होणार असून गहू, चण्याची दुबार पेरणी करावी लागणार आहे..याखेरीज सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांची अडचण झाली आहे… विद्यार्थ्यांना रेनकोट घालून आणि छत्री चा सहाय्याने शाळेत जावे लागले.. रिमझिम पावसामुळे वातावरणात अचानक गारठा निर्माण झाला असून अनेक जण स्वेटर, मफलर घालून आपले दैनंदिन व्यवहार करीत आहे. कालपासून नागपुरात ढगाळ वातावरण होते मात्र आज सकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावारणात गारठा तयार होऊन बोचरी थंडी जाणवू लागली आहे.
ML/KA/PGB 28 Nov 2023