नागपुरात मध्यरात्री ढगफुटी , एन डी आर एफ दाखल

नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):हवामान खात्याने मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता. त्या प्रमाणे नागपूर जिल्ह्यात देखील आज मध्य रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे ढगफुटी झाल्याचे चित्र होते. या आपत्तीमुळे एन डी आर एफ ला पाचारण करून पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले
या जोरदार पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी साचले असून अनेक घरात पाणी शिरलेले आहे. काही भागात घराची पड झड देखील झालेली आहे. मध्यरात्रीच्या पावसामुळे नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे अनेक घरात पाणी शिरलेले आहे.
नागपूर शहरामध्ये रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या सततधार पावसामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला असून जिल्हा आणि महानगर प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी तसेच महानगर पालिका आयुक्तांनी शहरातील अनेक भागांची पाहणी केली. शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवून आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांना ( जिल्हा आणि महानगर क्षेत्र ) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुट्टी जाहीर केली आहे.
ML/KA/PGB 23 Sep 2023