माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या वाढदिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि १०
शिवसेनेचे माजी नगरसेवक, वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त वरळी येथील मध्यवर्ती कार्यालय येथे वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वाढदिवस जल्लोषात साजरा केला. माझ्या वाढदिवसानिमित्त मी नेहमी सामाजिक, शैक्षणिक आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून माझे वाढदिवसाच्या दिवशी मी वरळी येथील नाना दुसऱ्या मध्ये जाऊन अनाथ नागरिकांना भेटवस्तू तसेच फळे वाटप करून माझा वाढदिवस साजरा केला. यापुढे देखील मी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक, वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांनी दिली. माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वरळी विधानसभा समन्वयक प्रशांत गवस, वरळी विधानसभा महिला विभाग प्रमुख रत्ना महाले, शिवसेना वरळी विधानसभा वैद्यकीय मदत पक्षाच्या पूजा बारिया, शाखाप्रमुख राजेश पांडे, राजेश सांगळे आणि इतर मान्यवर मंडळींनी विशेष मेहनत घेतली.KK/ML/MS