राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर

 राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर

मुंबई, दि. ४ : राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकासंदर्भात आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

“नगर परिषद आणि नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर करत आहोत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात ही 10 नोव्हेंबर 2025 पासून होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशन पत्राची 18 नोव्हेंबर 2025 ला छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत ही 21 नोव्हेंबर 2025 असेल. अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025 असेल”, अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

“निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ही 26 डिसेंबर 2025 ला जाहीर होईल. मतदानाचा दिवस हा 2 डिसेंबर 2025 असेल आणि मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025 असेल. शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस हा 10 डिसेंबर 2025 असेल”, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादेत वाढ

अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी 5 लाख आणि अध्यक्ष पदासाठी 15 लाख, ब वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार आणि सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार, क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार आणि सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार. नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार अशी खर्चाची मर्यादा आहे.

मतदारांसाठी जे संकेतस्थळ विकसित केली आहे त्यामध्ये सर्च फॅसिलिटी दिली आहे. त्यामध्ये मतादारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल. मतदारांसाठी मोबाईल अॅप तयार केलं आहे. त्यामध्ये तुमच्या उमेदवारांविषयी आणि इतर सर्व माहिती मिळेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *