नागपूर-नागभीड मार्गासाठी
राज्य शासन रेल्वेला देणार ४९१ कोटी रुपये…!

 नागपूर-नागभीड मार्गासाठीराज्य शासन रेल्वेला देणार ४९१ कोटी रुपये…!

चंद्रपूर दि २४:- नागपूर – नागभीड या ११६.१५ किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर करण्यात येत आहे. या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सुधारित खर्चास आणि त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार राज्य शासन आपला हिस्सा म्हणून रेल्वेला ४९१ कोटी ५ लाख रुपये देणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पांच्या खर्चाचा ४० ते ५० टक्के आर्थिक भार उचलण्याचे धोरण आहे. नागपूर-नागभीड हा मार्ग ब्रॉडगेज मार्गात रूपांतर केल्यास नागभीड ते वडसा – देसाईगंज आणि पुढे गोंदिया, गडचिरोली पर्यंत विस्तारला जाणार आहे. यामुळे या भागातील जनतेला दळणवळणाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचे जाळे सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या भागातील उद्योग आणि शेतकऱ्यांच्य विकासाला हातभार लागणार आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *