कर्नालमधील ४५ गायींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

 कर्नालमधील ४५ गायींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

कर्नाल, दि.१४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरयाणामधील कर्नालमध्ये एक माणूसकीला काळीमा फासणारी निर्दयी घटना समोर आली आहे. गाईला सामान्य पशू न मानता गोमाता मानणाऱ्या आपल्या सांस्कृतिक विश्वासाला भयंकर हादरा बसवणारी अशी ही घटना आहे. कर्नालमध्ये मागील महिन्यात एका गोशाळेत ४५ गाय़ींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता या गाईंच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे.  काही माथेफिरुनी या ४५ गायींना विषप्रयोग केल्याचे उघड झाले आहे.  गायींना गुळात सल्फास देऊन मारण्यात आले होते.

गाईचे कातडे आणि चरबी विक्रीचा अमानूष धंदा

याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड ठेकेदार फरार आहे.दारू पिऊन संपूर्ण कट रचण्यात आला. गायीचे कातडे व चरबी विकून आरोपी पैसे कमवत होते.
याआधीही आरोपींनी हे कृत्य केले होते. तेव्हा ते 4-5 गायींना विष देत होते. पण यावेळी अनेक गायींना विष दिल्याने सारा खेळ उघडकीस आला. या आरोपींनी अनेक वर्षांपूर्वी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचीही माहिती मिळते आहे.

गायींचा संशयास्पद मृत्यू

27 जानेवारीला सकाळी फुसगड गौशालात गायींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रात्री 2 वाजल्यापासून गायी मरायला लागल्या. सकाळपर्यंत 45 गायींचा मृत्यू झाला होता. याशिवाय 10 गायीही आजारी होत्या. त्यामुळे संपूर्ण प्रकरण संशयास्पद बनले. हे पाहून संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे.

गायींचे व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. तपासासाठी विभागीय आयुक्तांनी 4 सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समितीही स्थापन केली होती. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सेक्टर-32/33 पोलिस स्टेशन, कर्नाल येथे गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.

SL/KA/SL

14 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *