आरक्षणाबाबतीत माझी भूमिका सुसंवादाची

 आरक्षणाबाबतीत माझी भूमिका सुसंवादाची

छ. संभाजीनगर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके तसेच आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

शरद पवार दोन दिवसीय दौऱ्यावर असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा आणि इतर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विधानसभा जागा वाटप संदर्भात बोलताना तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत जी समिती तयार करायची आहे, त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली आणि बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसच्या वतीने नावं दिली. संसदेचं कामकाज संपलं की त्यानंतर समितीचं काम सुरू होईल. काहीही झालं तरी जागेसंदर्भातील निकाल एकत्र बसून घ्यावा, एकवाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे असं शरद पवार म्हणाले.

तसेच डावे पक्षही महत्त्वाचे आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत एकही जागा राज्यात न मागता आम्हाला सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही घ्यावी आणि डावे पक्षांना काही जागा द्यावात, अशी चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण या योजनेवर टिका करताना, योजनांचा पहिला हप्ता जमा होईल, सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, निवडणूक पूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय होईल. यापूर्वी सत्ता असताना का निर्णय घेतले का नाही ? निवडणूक असल्याने हे निर्णय घेतल्याचं लोकांना देखील माहिती आहे. असं मत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.

ML/ML/SL

27 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *