मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन लोकांना मी व्यवसाय देत नाही म्हणणाऱ्या टीसीचे रेल्वेने केले निलंबन

 मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन लोकांना मी व्यवसाय देत नाही म्हणणाऱ्या टीसीचे रेल्वेने केले निलंबन

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वेचे तिकीट कलेक्टर (TC) आशिष पांडे यांनी महाराष्ट्रातील लोक आणि मुस्लीम समाजाविरुद्ध भेदभाव करणारे वक्तव्य केल्याने मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील परंतु मुंबईतील विक्रोळी येथे राहणारे पांडे यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते ‘मराठी किंवा मुस्लीम व्यवसायिकांकडून खरेदी करणार नाही तसेच मराठी किंवा मुस्लीम चालक असणारा ऑटो-रिक्षा वापरणार नाहीत,’ असे म्हणताना ऐकू येत आहे. मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो, अशी मुजोरीची भाषा आशिष पांडे याने वापरली होती. यानंतर पश्चिम रेल्वेने आशिष पांडेचं निलंबन केलं आहे.सोशल मीडियावर आशिष पांडे ( Ashish Pande ) आणि मराठी व्यावसायिकाची क्पिप चांगलीच व्हायरल झाली. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या. यानंतर DRM मुंबई सेंट्रल यांनी आशिष पांडेचं निलंबन केलं आहे. आम्ही या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे.

TR/ML/PGB
23 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *