भारतातील मुस्लिम घुसखोर नाहीत

अकोला , दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतातील मुस्लिम हे घुसखोर नाहीत. ते आपल्या, विविधतेने नटलेल्या, बहुविध आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
आरएसएस-भाजप सातत्याने भेदभावपूर्ण धोरणे राबवून भारतातील मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस याबाबत भीतीपूर्ण मौन बाळगून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.सीएए- एनआरसी हे त्याचे उदाहरण असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ML/ML/PGB 22 APR 2024