*मुरुडमधील शिंदे गटाचे नेते मंगेश दांडेकर यांच्या हाती घड्याळ

मुंबई, दि 28
मुरुड येथील शिंदे गटाचे प्रमुख नेते मंगेश दांडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
दरम्यान मंगेश दांडेकर हे पुन्हा स्वगृही परतल्याने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले.
मंगेश दांडेकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले सोसायटीचे चेअरमन अजित गुरव, शिंदे गटाचे नेते नितीन पवार, अमित कवळे, राकेश मसाळ, शिगरे -मुरुडचे माजी सरपंच हाफिजू कबले, बेलवडेचे माजी सरपंच कृष्णा म्हात्रे, राकेश चौगुले, विलास पाटील, निलेश पाडगे, इम्तियाज कडू आदींनी प्रवेश केला. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरुडचे तालुकाध्यक्ष फैरोज घरटे, अलिबाग मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, मनोज अप्पा भगत, अजित कासार, हसमुख जैन उपस्थित होते.