बंगाल क्लबला पालिकेची नोटीस
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबला पालिकेने नोटीस बजावली आहे. Municipal Notice to Bengal Club प्रशासनाकडून खानपानासाठी व्यवस्था करताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
दादरच्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबची २२ नोव्हेंबर रोजी पालिकेकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीत उपहागृहात परवानगी न घेता सहा सिलिंडरचा वापर करत असल्याचे तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी न घेता खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. हे धोकादायक असल्याने पालिकेच्या जी/उत्तर विभागाकडून या क्लबला मुंबई महानगरपालिका अॅक्ट नुसार ३९४ (४) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत याबाबत कार्यवाही करा, अन्यथा पालिका कारवाई करेल असे जी/उत्तर विभागाचे वैद्यकीय अधिकारी विरेंद्र मोहिते यांनी म्हटले आहे.
ML/KA/PGB
26 Nov .2022