मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
ठाणे दि १३ :- मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही अभियंते विशाल डोळस आणि समर यादव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अभियंत्यांचे वकील आता शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. अभियंत्यांच्या वकिलांनी सांगितले की अपघात हा गर्दीमुळे झाला असून अभियंत्यांची कोणतीही चूक नाही. रेल्वे इंजिनिअरनेही हा फक्त दुर्दैवी अपघात असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला बॅगमुळे अपघात झाल्याचे म्हटले होते, मात्र अपघातानंतरच्या व्हिडिओंमध्ये जखमींसोबत त्यांच्या बॅगा दिसत आहेत. घटनेचा पंचनामा काही तासांनंतर झाल्याने आणि मार्गावरून इतर गाड्या गेल्याने वस्तुस्थितीबाबत शंका उपस्थित होत आहे.ML/ML/MS