विजय हजारे ट्राॅफीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची तुफानी खेळी

 विजय हजारे ट्राॅफीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची तुफानी खेळी

अहमदाबाद, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये सुरु असलेल्या विजय हजारे ट्राँफी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेने नागालँड विरुद्ध तुफानी खेळी केली आहे. या सामन्यात आयुषने त्याच्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले आहेत. ११७ बॉल्समध्ये त्याने १८१ रन काढल्या आहेत. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट १५४ पेक्षा अधिक होता. त्याने एकूण ११ सिक्स आणि १५ फोर मारले.

आयुष्यचा जन्म मुंबईमध्ये २००७ मध्ये झाला. २०२४ च्या इराणी चषका दरम्यान त्याने मुंबईसाठी प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने रणजी ट्राँफीमध्ये पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले. आयुषच्या आजच्या कामगिरीमुळे लवकरच भारतीय क्रिकेट संघात या तरुणाचा प्रवेश होईल असे मानायला हरकत नाही, हेच आयुषने आज सिद्ध केले आहे.

SL/ML/SL

31 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *