मुंबई पुणे एक्सप्रेसवर एसटी बसचा अपघात, हाजी अराफत शेख यांची मदत.

 मुंबई पुणे एक्सप्रेसवर एसटी बसचा अपघात, हाजी अराफत शेख यांची मदत.

पुणे, दि १० :
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा एक्झिट पॉइंटच्या पुढे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आज पहाटे हिरकणी एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला. या अपघातात बसमधील चालक अडकून पडले होते व अनेक प्रवासी भयभीत अवस्थेत अडकलेले होते.

अपघाताच्या काही वेळातच भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा ताफा त्या मार्गावरून प्रवास करत होता. हे भयावह दृश्य पाहताच त्यांनी आपली वाहने थांबवली आणि तातडीने IRB/ 108 पथकाला मदतीसाठी कॉल केला. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीने अपघाती व्यक्तींना मदत केली तसेच महामार्ग पोलीस यंत्रणेला देखील सूचना देण्यात आल्या.

माजी मंत्री हाजी अरफात शेख यांच्या मदतीमुळे एसटी महामंडळाचे अडकलेले प्रवासी बाहेर काढले गेले आणि जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. IRB पथक व महामार्ग पोलीस घटनास्थळी तत्परतेने दाखल झाले. त्यामुळे जीवितहानी टळली व मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी हाजी अराफत शेख यांचे आभार मानले. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *