मुंबईकरांना मिळणार वॉटर मेट्रोची सुविधा

 मुंबईकरांना मिळणार वॉटर मेट्रोची सुविधा

छायाचित्र प्रातिनिधीक

मुंबई, दि. १७ : मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून लवकरच वॉटर मेट्रोचा पर्याय दिला जाणार आहे. दरम्यान वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईत वाहतूक कोंडीला पर्याय वॉटर मेट्रो सुरू होईल अशी नागरिकांना आशा आहे. मुंबई वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पाहणीचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेड कंपनीला देण्यात आलं होतं. त्यांच्या अहवालाचं सादरीकरण 16 जून रोजी मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासमोर सादर करण्यात आलं होतं.

डिसेंबर 2026 पासून मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. एकूण 29 टर्मिनल उभारण्यात येणार असून उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत आणि नवी मुंबईतील दक्षिण मुंबईत येण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल.

सध्या कोचीमध्ये सुरू असलेली वॉटर मेट्रो सेवा ही देशातील पहिली वॉटर मेट्रो आहे. ती 2023 मध्ये सुरू झाली. तेथे ही सेवा यशस्वी राहिली आणि कोच्ची परियोजनाच्या यशामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मुंबईतही जल वाहतूक वाढविण्यासाठी ही योजना तयार केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *