मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र

मुंबई, दि २
आधुनिक मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेन्ट्रल टर्मिनलला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृह खात्याकडे प्रलंबित असून त्यास मान्यता मिळवून देऊन नामांतराचा प्रश्न मार्गी लागावा. हा विषय लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचे निवेदन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्राध्यापक खासदार वर्षाताई गायकवाड यांना मुंबई काँग्रेस सहकार सेलचे प्रशासन प्रमुख श्रीनिवास देवरुखकर यांनी त्यांना मुंबई काँग्रेस कार्यालयात दिले. नामदार नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला देण्यासाठी अनेक प्रस्ताव झाले किंवा अनेक वेळा बैठका देखील झाल्या. तसेच अनेक रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन देखील दिले परंतु आज तक आहेत त्यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला मिळाले नाही ही एक शोकांतिका आहे. जोपर्यंत नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंटर रेल्वे स्थानकाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा अधिक तीव्र करू अशी माहिती मुंबई काँग्रेस सहकार सेलचे पदाधिकारी प्रशासन प्रमुख श्रीनिवास देवरुखकर आणि काँग्रेस पदाधिकारी आदीप वेर्नेकर यांनी दिली.KK/ML/MS