धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार

 धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार

मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क): धनगर व धनगड या शब्दातील ” ड ” या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

धनगर एस टीआरक्षण अंमलबजावणी, आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधीनां संधी मिळावी. १९५६ च्या एस टी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग धनगर याऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.

धनगर समाज कोणाच्या ताटातले आरक्षण मागत नाही जे घटनेत आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे बबनराव मदने म्हणाले. यावेळी पक्षाच्या स्वामिनिताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, श्रीकांत मयेकर, भूषण नागवेकर, समर्थ भाईंदरकर, ललन पाल, सुरेश बोहोत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

SW/ML/SL

5 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *