आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक वधारला

 आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक वधारला

क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी नुकतीच आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे रॅंकींगमध्ये दिसून आले आहे. मुंबई विद्यापीठाने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात मोठी सुधारणा करत 291 ते 300 या बँडमधून बाहेर पडत थेट 245 क्रमांकावर झेप घेतली आहे. विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत सर्वसाधारण गुणात उल्लेखनिय कामगिरी करत 19 गुणांवरून 34 गुण प्राप्त केले आहेत. तर दक्षिण आशिया क्रमवारीत उत्कृष्ट कामगिरी करत 67 क्रमांकावरून 52 क्रमांक पटकावला आहे. नुकतीच आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे.

क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 अहवालानुसार मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत रँकिंगच्या सर्व निकषात भरीव सुधारणा केली आहे. धोरणात्मक सुधारणेला प्राथम्य देऊन संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता अशा अनुषंगिक निकषांत विद्यापीठाने मोठी सुधारणा केली आहे. पेपर्स पर फॅकल्टी, नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क, विद्याशाखा-विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा गुणोत्तर, आणि पीएचडी असलेले शिक्षक यांसारख्या महत्त्वाच्या निकषात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाने 76 टक्क्यांनी सुधारणा करत दर्जेदार कामगिरी केली आहे. विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील मागील स्तर टिकवून ठेवले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *