मुंबईतील पश्चिम – पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करा

मुंबई , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील टोल नाक्यावरील वसुली थांबवावी. राज्य सरकारने msrdc अंतर्गत असणारे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरचे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. मुंबई महापालिका या रस्त्यांची विशेष काळजी ( डागडुजी ) करत असताना. या रस्त्यांवरची टोल वसुली करत आहे.ही टोल वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.आमचं सरकार आल्यावर टोल वसुली बंद करणार असे आश्वासन आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे.याचवेळी राज्य सरकारला आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित करत. राज्य सरकार मग टोल नाका आणि इतर जाहिरातींच्या होर्डिंग चे पैसे ही मुंबई महानगरपालिकेला का नाही देत असा सवाल केला आहे.ही सगळी वसुली राज्य सरकार msrdc कडे कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहे का असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. सर्वात जास्त कर मुंबईकर देत असतात. मुंबई गोवा महामार्ग आणि इतर रस्ते हे चंद्रा वरील खड्ड्यां सारखे झाले आहेत. ही टोल वसुली बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही.कारण आंदोलन केले तर टोल वर काम करणाऱ्यांना त्रास होईल.मी मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे.पण हे सरकार वसुली सरकार आहे कंत्राटदाराच सरकार आहे असा आरोप त्यांनी केला.
ML/KA/PGB 7 Aug 2023