मुंबई महापालिकाचे पहिले पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेने शहरातील पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले आहे. हे रुग्णालय जूनच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या रुग्णालयात भटके आणि पाळीव कुत्रा, मांजर, गुरेढोरे यांच्यावर २४ तास उपचार करण्यात येणार आहेत. यामुळे जखमी प्राण्यांमुळे मानवाला होणारा त्रासही दूर होणार आहे.
मुंबईत सुमारे १ लाख १५ हजार पाळीव प्राणी आहेत. यामध्ये गुरे, म्हशी, शेळ्या-मेंढ्या,श्वान आदींचा समावेश आहे.या नवीन रुग्णालयात एकाच वेळी सुमारे ४०० प्राण्यांवर उपचार करता येणार आहेत. रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मात्र मोठी शस्त्रक्रिया, सीटीस्पॅन आणि एमआरआयसाठी पैसे आकारले जाणार आहे. भटक्या जनावरांना २४ तास मोफत रुग्णवाहिकेची सेवा असणार आहे. शस्त्रक्रिया, गायनॉकोलॉजी, अपघात, इमर्जन्सी वॉर्ड,आयसीयू, आसीसीयू,पॅन्सर वॉर्ड, बर्न अण्ड स्कीन वॉर्ड, ओपीडी मेडिसिन ओपीडी, सीटीस्पॅन, एमआरआय, रेडिओलॉजी सोनोग्राफी, रक्तपेढी, डायलेसिस सेंटर अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध असतील.
सध्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी खार येथे महापालिकेचा एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे, तर मुंबई शहर व उपनगरात सुमारे २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परळमध्ये मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रिएटिव्ह क्रूएल्टी टूऑनिमल संस्थेचे खासगी रुग्णालय आहे.
SL/ML/SL
27 May 2024