मुंबई महानगरपालिकेचा ७४,४२७ कोटींचा करवाढ विरहित विक्रमी अर्थसंकल्प

 मुंबई महानगरपालिकेचा ७४,४२७ कोटींचा करवाढ विरहित विक्रमी अर्थसंकल्प

मुंबई दि.4(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेने सन २०२५-२६ साठी विक्रमी ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १४.१९% वाढ करत अर्थसंकल्पाचा आकार वाढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही करवाढ, दरवाढ किंवा शुल्कवाढ न करता हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.

महापालिकेने चालू आर्थिक वर्षात सुधारित ६५,१८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता, जो आता पुढील वर्षासाठी वाढवून ७४,४२७ कोटी रुपयांवर नेण्यात आला आहे. यामध्ये भांडवली खर्चासाठी ४३,१६२ कोटी रुपये आणि महसुली खर्चासाठी ३१,२०४ कोटी रुपये राखून ठेवले आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना वेग येणार आहे.

महसूल वाढीस प्राधान्य
महापालिकेने ९,७०० कोटी रुपयांचा महसूल विकास नियोजन खात्याकडून प्रस्तावित केला आहे. त्याचप्रमाणे,
मालमत्ता करातून – ५,२०० कोटी रुपये
गुंतवणुकीवरील व्याजातून – २,२८३ कोटी रुपये
जल व मलनिःसारण करातून – २,३६३ कोटी रुपये
अग्निशमन विभाग शुल्कातून – ७५९ कोटी रुपये
परवाना विभागाकडून – ३६२ कोटी रुपये
शासनाकडील थकबाकीतून – ६,५८१ कोटी रुपये या विविध मार्गांमधून महसूल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेत महसूल वाढीवर भर देण्यात आला आहे. अतिरिक्त चटई क्षेत्र अधिमूल्य, रिक्त भूभाग भाडेपट्टा, झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्ता कर यांसारख्या स्रोतांमधून २,६५० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेच्या या विक्रमी अर्थसंकल्पामुळे विकास प्रकल्पांना गती मिळेल, आर्थिक शिस्त राखली जाईल आणि नागरिकांवर कोणताही अतिरिक्त कर लादला जाणार नाही. त्यामुळे मुंबईच्या भविष्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

SW/ML/SL

4 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *