मुंबईतील टँकर संपाबाबत मुंबई मनपाचा मोठा निर्णय

 मुंबईतील टँकर संपाबाबत मुंबई मनपाचा मोठा निर्णय

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीवरून सुरू झालेल्या टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने MCGM मोठा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मुंबईतील विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाण्याचे टँकर्स अधिग्रहित करण्याचे आदेश MCGM आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईत पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी, विशेषत: उन्हाळ्यात, पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी MCGM ने हा निर्णय घेण्यात आलाय. खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायट्या) आणि इतर घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित करण्यात आली आहे.

टँकर चालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमावलीच्या विरोधात संप पुकारला आहे. या नव्या नियमांनुसार विहीर व कूपनलिका धारकांनी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर BMC ने संबंधित विहीरधारकांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार BMC ने त्या नोटिशींना 15 जून 2025 पर्यंत स्थगिती दिली आहे.तरीदेखील टँकर चालकांनी संप मागे घेतलेला नसल्याने, पाण्याच्या गरजेचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे टँकर आणि विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलीस, परिवहन आयुक्त आणि BMC विभाग कार्यालयांच्या समन्वयातून पथके तयार करून उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

SL/ML/SL
13 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *