मुंबई मनपा उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

मुंबई, दि. २ : भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. हे मत्स्यालय पेंग्विन कक्षाजवळच तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे व आकाराचे मासे पाहता येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ७० कोटी खर्च करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.राणी बागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये
- या मत्स्यालयाच्या बांधकामामध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल.
- आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालयाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात ॲक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत.
- जलचरांसाठी मत्स्यालयाअंतर्गत नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्कची व्यवस्था करण्यात येणार आहे.